राहुलने पवार आणि उद्धवना डिवचले

राहुलने पवार आणि उद्धवना डिवचले

मुंबई, १ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष फुटलेला नाही, या शब्दात राहुल गांधी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना डिवचले. ते मुंबईत काँग्रेसच्या टिळक भवन येथील कार्यालयात बोलत होते.

मोदी विरोधी आघाडीची बैठक मुंबईत झाली. या बैठकीसाठी राहुल गांधी मुंबईत आले होते. मोदी विरोधी गटाच्या बैठकीनंतर एक सभा झाली. या सभेत प्रसारमाध्यमांसमोर मोदी विरोधी आघाडीच्या नेत्यांनी भाषणं केली. याप्रसंगी राहुल गांधी यांनी इंग्रजी भाषेत भाषण केले. यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या टिळक भवनला भेट दिली. टिळक भवनात राहुल गांधी यांनी हिंदी भाषेत छोटेखानी भाषण केले. या भाषणातून राहुल गांधी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वाकुल्या दाखवल्या.

काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्याचे राहुल गांधी म्हणाले. हे वक्तव्य करून त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे त्यांच्या पक्षाची जागा दाखवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

विदेशी वृत्तपत्रे दाखवत इंग्रजीत बोलले राहुल गांधी

मोदी विरोधी आघाडीची बैठकीसाठी मुंबईत आलेल्या राहुल गांधी यांनी गुरुवारी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी इंग्लंडमधील दोन इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांचा संदर्भ देत राहुल गांधींनी अदानींच्या आडून थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. यानंतर मोदी विरोधी गटाच्या शुक्रवारी झालेल्या सभेत राहुल गांधी पुन्हा इंग्रजी भाषेत बोलले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version