वृत्तसंस्था, दिल्ली
मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवल्यानंतर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींजवळ जात त्यांना चक्क मिठी मारली आणि सगळेच चकीत झाले.
मोदी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताववर लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली. राहुल गांधी यांनी राफेल विमान करार, बेरोजगारी आणि जीएसटीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. राहुल गांधींच्या आरोपामुळे सत्ताधार्यांनी प्रचंड गदारोळ केला.
चर्चेच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केले, ”आज आपल्या संसदीय लोकशाहीचा महत्त्वाचा दिवस आहे. मला सहकारी खासदारांवर विश्वास आहे की, ते या निमित्ताने पुढे येऊन कुठल्याही अडथळ्याविना सकारात्मक आणि विस्तृत चर्चा पुढे नेतील. आम्ही देशाची जनता आणि संविधान निर्मात्यांचे ऋणी आहोत. पूर्ण देशाच्या नजरा आपल्यावर राहतील.”
Today is an important day in our Parliamentary democracy. I am sure my fellow MP colleagues will rise to the occasion and ensure a constructive, comprehensive & disruption free debate. We owe this to the people & the makers of our Constitution. India will be watching us closely. — Narendra Modi (@narendramodi) July 20, 2018
राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान ‘पप्पू’वरून मोदींवर पलटवार केला. “भाजपसाठी मी पप्पू आहे परंतु माझ्या मनात द्वेष नाही. भाजप आणि संघाने मला भारतीय, हिंदू असल्याचा अर्थ समजावून सांगितला, मी त्यांचा आभारी आहे.” भाषणानंतर राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली. मोदींनीही राहुल गांधींसोबत हस्तांदोलन केले.
राहुल गांधी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे…
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.