Rahul Gandhi’s Allegations about Fraud in Voting : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक निकालांवरून मोठा आणि गंभीर आरोप केला आहे. आता त्यांनी हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या ठिकाणीही मतांची चोरी (Vote Stealing) झाली आहे, असा खळबळजनक दावा राहुल गांधी केला आहे. गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आरोपांची सरबत्ती केल्यानंतर, आता त्यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा उचलला आहे.
‘लोकशाहीवर हल्ला’
राहुल गांधींनी म्हटले आहे की, त्यांच्याकडे मतचोरीचे सर्व पुरावे आहेत आणि ते हळूहळू हे पुरावे जनतेसमोर आणणार आहेत. तसेच, या संदर्भात ते निवडणूक आयोगाकडेही दाद मागणार आहेत.
राहुल यांचा थेट आरोप: “मी स्पष्टपणे सांगू शकतो की, हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्र, छत्तीसगढ, मध्य प्रदेश या ठिकाणीही मतांची चोरी झाली आहे. लोकशाहीवर आणि संविधानावर हल्ला केला जातो आहे. हा हल्ला नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार करत आहेत. यामुळे भारतमातेचे मोठे नुकसान होत आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा – Rare Earth Elements: चीनला टक्कर देण्यासाठी भारताचे “रेअर अर्थ” मिशन; तब्बल 7300 कोटींची योजना!
मागील निवडणुकीतील यशावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुका मागील वर्षी पार पडल्या होत्या, ज्यात भाजपला मोठे यश मिळाले होते. महाराष्ट्रात महायुतीला तब्बल 232 जागा मिळाल्या होत्या, ज्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अजित पवार तसेच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले. पण महायुतीला मिळालेल्या या प्रचंड यशावरच राहुल गांधींनी आता शंका उपस्थित केली आहे.
पूर्वीचे दावे: यापूर्वीही राहुल गांधींनी याच प्रकारे आरोप केले होते. हरियाणात 25 लाख मतांची चोरी झाली, तसेच एका ब्राझीलच्या महिलेने 10 बूथवरून 22 वेळा मतदान केले, असे खळबळजनक आरोप त्यांनी केले होते.
हरियाणा में साफ तौर से वोट चोरी हुई है। ऐसा ही मध्य प्रदेश, महाराष्ट्र और छत्तीसगढ़ में भी हुआ। BJP और चुनाव आयोग ने वोट चोरी का सिस्टम बनाया है। हमारे पास वोट चोरी के और सबूत हैं, जो हम आगे दिखाएंगे। लोकतंत्र और संविधान पर हमला हो रहा है। ये हमला नरेंद्र मोदी, अमित शाह और… pic.twitter.com/xIpgiB2Y0t — Congress (@INCIndia) November 9, 2025
भाजप आणि निवडणूक आयोगाने या आरोपांना उत्तर दिले असतानाही, राहुल गांधींनी पुन्हा एकदा महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशात मतचोरी झाल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार केला आहे. लवकरच महाराष्ट्रात नगरपंचायत, नगरपालिका आणि महापालिका निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी केलेल्या या आरोपांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
हेही वाचा – PM Narendra Modi: “न्यायाची भाषा सामान्य नागरिकाला समजली पाहिजे”, पंतप्रधान मोदींचा संदेश
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.