दिल्ली महानगर पालिकेत निवडणुकीत भाजपाची १५ वर्षांची सत्ता उलथवून लावत आप ने सत्ता स्थापन केली आहे. मात्र आज महापौर आणि स्थायी समिती सदस्य निवडणुकीच्या दिवशी सभागृहात प्रचंड गोंधळ माजला होता. महापालिकेच्या सभागृहात महापौर, उपमहापौर स्थायी समिती सदस्यांची निवड प्रक्रिया करण्यासाठी हि बैठक बोलावण्यात आली होती.
परंतु निवडणुकीची प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी नगरसेवकांना शपथ घ्यावी लागते. आणि त्यापूर्वी आम आदमी पार्टीच्या नगरसेवकांनी चुकीच्या पद्धतीने शपथ घेतली असल्याचा आरोप करत सभागृहात गोंधळ घालण्यात आला. महानगरपालिकेच्या कामकाजाच्या सुरुवातीलाच आप आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये वादावादीला सुरुवात झाली आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला.
जवळपास महिनाभरानंतर महापालिकेतील महापौर पदाची निवडणूक होत आहे. दरम्यान, स्वीकृत सदस्यत्वाच्या मुद्यांवरून जोरदार राडा सुरु झाला. या ठिकाणी भाजप आणि आपच्या नगरसेवकांनी एकमेकांच्या अंगावर जात धक्काबुक्कीही केली. मात्र, दोन्हीही पक्षातील सदस्यांकडून सभागृहात गोंधळ घातला जात आहे. सध्या आया ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.