CCTV ला पण नाय घाबरत पुणेकर

CCTV ला पण नाय घाबरत पुणेकर

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

साधारणपणे दोन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयानं दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरणं सक्तीचं केलं. त्यानुसार राज्यात सुरुवातीला मुंबई, नागपूर आणि औरंगाबादमध्ये हेल्मेट वापरणं सक्तीचं केलं. त्यानंतर पुण्यात हा नियम लागू केला. पण पुणेकरांनी त्याला कडाडून विरोध केला.

हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीतर्फे आंदोलनंही करण्यात आली. दुचाकीस्वारांनी हा आदेश जुमानला नाही. हीच गत आता वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आहे.

या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना पुणेकरांसह पिंपरी-चिंचवडचे नागरिक जुमानत नसल्याचं समोर आलंय.

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बेदारकपणे वहाने चालविणाऱ्या चालकांवर नजर ठेवण्यासाठी प्रशासनानं पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरामध्ये बाराशे एकोणसाठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत. नियम तोडणाऱ्या वाहनचालकाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होतेय आणि आकारलेल्या दंडाच्या रकमेचा एसएमएस वाहतूक विभागाकडून संबंधित चालकास पाठविला जातो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version