Rupali Thombare Patil : सरकारी कामात अडथळा! रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल; मतमोजणी केंद्रावर गोंधळ घालणं भोवलं

महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान मतदान केंद्रात गोंधळ घालणे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना भोवलं आहे.
Rupali Thombare Patil : सरकारी कामात अडथळा! रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल; मतमोजणी केंद्रावर गोंधळ घालणं भोवलं

पुणे : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान मतदान केंद्रात गोंधळ घालणे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना भोवलं आहे. मतमोजणीवेळी निवडणूक प्रक्रिया व शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रूपाली ठोंबरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात 29 महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया 15 जानेवारी रोजी पार पडली. तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया झाली. त्या दिवशी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील टिळक रस्त्यावरील डीईएस न्यू इंग्लिश स्कूल येथे मजमोजणी सुरू असताना हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणी सुरू असताना रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्या हरकत अर्जाची पोहोच द्यावी, अशी मागणी करून मतदान मोजणी केंद्रात उभारलेल्या सुरक्षा जाळीवर चढून आरडाओरड केली.

हेही वाचा : Pune Train Updates: हुतात्मा ते गरीबरथ… ब्लॉकमुळे पुण्यातून सुटणाऱ्या ‘या’ 26 एक्स्प्रेस रद्द; पाहा बदललेले मार्ग आणि वेळा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version