Pune Nasrapur Case : नसरापूर प्रकरणाचा आज निकाल; सर्वात जलद खटल्यांपैकी एक ठरण्याची शक्यता?

भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आण हत्येच्या प्रकरणात तपास यंत्रणा आण न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने पूर्ण झाला आहे.
Pune Nasrapur Case : नसरापूर प्रकरणाचा आज निकाल;  सर्वात जलद खटल्यांपैकी एक ठरण्याची शक्यता?

भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आण हत्येच्या प्रकरणात तपास यंत्रणा आण न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने पूर्ण झाला आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांत तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या, युक्तिवादही पूर्ण झाला असून, या प्रकरणी आज (25 जून) आरोपीला शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. देशात आजपर्यंत हत्या आणि अत्याचारसारख्या गंभीर प्रकरणात घटनेपासून शिक्षेपर्यंतचा प्रवास 55 दिवसांत पूर्ण होण्याची ही दुसरीच घटना ठरू शकते. 

हेही वाचा- Crime News : अवघ्या 20 दिवसांच्या चिमुकल्याचा लाखोंमध्ये सौदा; पती-सुनेचा धक्कादायक कट उघडकीस

नसरापूर येथे 1 मे 2026 ला आजीच्या घरी सुट्टीदरम्यान राहायला आलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीला जवळच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली होती. ग्रामस्थांनी आंदोलन करत रस्ता रोको देखील केला होता. त्या पाठोपाठ पुण्यात देखील नवले पुलाच्या परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं. या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत होती.

त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत सीसीटीव्ही फुटेज, न्यायवैद्यकीय पुरावे, ‘डीएनए’ अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे संशयिताला अटक केली. पोलिसांनी 16 दिवसात सुमारे 1200 पानी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. यानंतर  सरकार पक्षाने वैज्ञानिक पुरावे आणि प्रत्यक्ष साक्षीदारांच्या आधारे आपली बाजू मांडली तसेच बचाव पक्षालाही युक्तिवादाची संधी देण्यात आली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात 21 मेपासून या खटल्याची दैनंदिन सुनावणी सुरू झाली होती. अवघ्या पावणेदोन महिन्यांत कामकाज पूर्ण झालं असून या प्रकरणाचा निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळे आता या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version