‘मी खडसेंच्या सीडीची वाट बघतोय’

‘मी खडसेंच्या सीडीची वाट बघतोय’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याची वाट पाहत असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे. माझ्यामागे ‘ईडी’ लावली तर मी सीडी बाहेर काढेन, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे एकदा म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी असं वक्तव्य केलं आहे.

‘केंद्रीय यंत्रणांचा काँग्रेसच्या काळातही गैरवापर झाला,भाजप असतांनाही तसाच गैरवापर होतोय’, अशी टीकासुद्धा राज ठाकरे यांनी यावेळी केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते रविवारी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने नुकतीच एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली होती. त्यानंतर ईडीकडून एकनाथ खडसे यांचीही चौकशी करण्यात आली होती.

तसेच ‘मराठा, ओबीसी आरक्षण सर्वांनाच मान्य आहे तर अडलंय कुठं?’, असा सवालदेखील राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. ‘मराठा आरक्षणाकरीता मुंबईमध्ये मोर्चा निघाला होता, त्यावेळी सगळेच नेते गेले होते. मग त्यावेळी सगळ्यांना मान्य आहे तर मग अडलंय कुठे’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version