Pune Crime : बसनंतर पुण्यात चालत्या कारमध्ये अत्याचार! घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवलं अन्…

नुकतीच राजधानी दिल्लीत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रातील पुण्यात झाली आहे. दिल्लीतील धावत्या बसनंतर आता पुण्यात चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार केल्याची  धक्कादायक घटना समोर आली आहे.
Pune Crime : बसनंतर पुण्यात चालत्या कारमध्ये अत्याचार! घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवलं अन्…

नुकतीच राजधानी दिल्लीत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रातील पुण्यात झाली आहे. दिल्लीतील धावत्या बसनंतर आता पुण्यात चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार केल्याची  धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील मुंडवा कोरेगाव पार्क रस्त्यावर हा थरारक प्रकार घडला आहे. मध्यरात्री एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी आलेल्या महिलेला घरी सोडण्याच्या बाहान्याने कारमध्ये बसवले आणि तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा- Pune Crime: संतापजनक! नराधम पतीने पत्नीच्या गुप्तांगावरच ओतले ॲसिड, 15 दिवस घरात डांबले अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री पार्टीत गेलेल्या पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेल मधून महिला आणि पुरुष सोबतच बाहेर पडले होते. पार्टीत ओळख झालेल्या या पुरुषाने महिलेला घरी सोडतो म्हणून नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version