Pune News : विनापरवानगी कार्यक्रम करणं भोवलं; राधा पाटीलसह मंडळाच्या अध्यक्ष, आयोजकावर गुन्हा दाखल

Pune News : विनापरवानगी कार्यक्रम करणं भोवलं; राधा पाटीलसह मंडळाच्या अध्यक्ष, आयोजकावर गुन्हा दाखल

पुणे : दहीहंडी कार्यक्रमात कार्यक्रम सादर करताना अश्लिल नृत्य सादर होऊ नये,यासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली होती. या आदेशानुसार प्रमाणपत्र सादर न केल्याने मंडळाला कार्यक्रमाची परवानगी नाकारली होती.असे असताना कार्यक्रम करणाऱ्या प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष, आयोजकावर बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लावणी नृत्यांगणा राधा पाटील (रा. मुंबई), एम्पायर ग्रुप ए के बॉइजचे अध्यक्ष भुषण अभिमान सोनवणे (रा. अंबामाता मंदिराजवळ, सुखसागरनगर, भाग 1, कात्रज) आणि आयोजक अमोल काटे (रा. कात्रज) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा : Pawar Vs Pawar : बारामतीत पुन्हा प्रतिष्ठेची निवडणूक! सोमेश्वर कारखान्यावर वर्चस्व कोणाचं? काकी विरूद्ध पुतण्या लढत होणार?

मंडळाचे अध्यक्ष, आयोजक तसेच प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करणाऱ्या लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्राधिकृत कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र सादर न केल्याने बिबवेवाडी पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version