मुंबई, १५ जून २०२३ , प्रतिनिधी : अभिनेते रजनीकांत यांच्या ‘कबाली’ या चित्रपटाचा निर्माता सुंकारा कृष्ण प्रसाद चौधरी ऊर्फ के. पी. चौधरीला मंगळवारी अटक झाली. सायबराबाद स्पेशल ऑपरेशन टीमने त्याला अटक केली असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त करण्यात आलं आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात चौधरीचे ड्रग्स प्रकरणात दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अनेक क्लायंट टॉलिवूड आणि कॉलिवूडसह चित्रपट वर्तुळात आणि बिझनेस वर्तुळातही पसरल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्याने पेटिट इबुझर या नायझेरियन नागरिकाकडून गांजा विकत घेतला होता. या गांजाचं सेवन तो स्वत: करत होता आणि त्यांच्या क्लायंट्सना विकण्यासाठी वापरत होता. के. पी. चौधरीचं कनेक्शन ड्रग किंगपिन एडविन न्यून्सशीही आढळलं आहे, ज्याला HNEW ने यापूर्वी अटक केली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.