डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी चार जण अटकेत…

डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी चार जण अटकेत…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

29 सप्टेंबरला झालेल्या धो धो पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले होते. त्यामुळे या पाण्याच्या प्रवाहात अनेक जण वाहून गेले होते. त्याच दिवशी बॉम्बे हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोल मध्ये पडल्याने मृत्यू झाला होता.

मॅनहोल उघडा कोणी ठेवला होता? जर तो मॅनहोल बंद केला असता तर कदाचित डॉ. अमरापूरकर यांचा जीव वाचू शकला असता. यासाठी पोलीस भूयारी गटारद्वार उघडे ठेवण्याला नक्की जबाबदार कोण आहे याचा तपास करत होते.

डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी परळमध्ये राहणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. २२ सप्टेंबरपर्यंत या चौघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version