कल्याणमधील पाईपलाईन फुटली

कल्याणमधील पाईपलाईन फुटली

कल्याणमध्ये जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. कल्याणमधील आधारवाडी गणेश चौक परिसरामध्ये ही घटना घडलीये. जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागला आहे. स्थानिक नगरसेवक आणि पालिका अधिकारी घटनास्थळी धाव घेत जेसीपीच्या सहाय्याने पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेच्या स्टेम प्राधिकरणाची १८०० एम.एम व्यासाची ही जलवाहिनी आहे. व्हॉल लिकेज झाल्याने घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

कल्याणमधील आधारवाडी गणेश चौक परिसरामध्ये ही घटना घडलीये. जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळालं. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांसह या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला असून. एमआयडीसीच्या कारभारावर देखील नाराजी व्यक्त करण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version