जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी
आपण सगळेच फेसबुकचा वापर फोटो शेअरिंग किंवा चॅटिंगसाठी करतो. मात्र, पिंपरीतल्या एका तरूणीनं फेसबुकचा वापर चक्क एका चोराला अद्दल घडवण्यासाठी केलाय. हुशार तरूणीनं फेसबुकच्या मदतीनं चोराला गजाआड केलंय. OLX सारख्या वेबसाईटवर मोटारसायकल विकून लुबाडणाऱ्या राहुल प्रजापतीला चांगलीच अद्दल घडवलीय.
पिंपरीतील दापोडीमध्ये राहणाऱ्या आरजू मनयारनं जुनी मोटारसायकल विकण्यासंदर्भात OLXवर पोस्ट टाकली होती. आरोपी राहुलने त्या पोस्टला प्रतिसाद दिल्यानंतर मनियारने आपल्या मुलीला मोटारसायकल दाखवण्यासाठी पाठवलं. परंतु हा भमटा आरोपी राहुल मोटारसायकल घेऊन पसार झाला. त्यावर मुलगी आरजूनं राहुलला धडा शिकवण्यासाठी त्याच्याशी फेसबुकवर मैत्री केली.
राहुल आरजूच्या जाळ्यात पुरता अडकल्यावर आरजूने त्याला भेटायला बोलावले. तेव्हा, आरजूनं त्याच्यासोबत पोलिसांनाही बोलावलं. त्यामुळे पोलिसांनी राहुलच्या मुसक्या आवळल्या. राहुल हा मुळचा इंदापूरचा असून त्याने अशाप्रकारे अनेकांना लुबाडलं होतं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.