पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच असल्याचं पाहायला मिळतं आहे.
मुंबईत पेट्रोलच्या दरात 14 पैशांची तर डिझेलच्या दरात 11 पैशांनी वाढ झाली आहे.
त्यामुळे पेट्रोलसाठी लीटरमागे 90.22 तर डिझेलसाठी 78.69 मोजावे लागत आहे.
इंधनात होणाऱ्या या रोजच्या वाढीमुळे सर्व सामान्य हैराण झाले आहेत.
दररोज होणारी ही इंधन दरवाढ थांबणार तरी कधी ? प्रशासन यावर तोडगा काढणार तरी कधी ?, असा सवाल आता सर्व सामान्यांकडून उपस्थित होत आहे.
रोज वाढणारी ही दरवाढ पाहता प्रशासन ढिम्मचं असल्याचं दिसून येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.