गोंदिया शहरातील पिंडकेपार या परिसरात राईस मिल २४ तास सुरु राहत असल्याने परिसरातील लोकांना या राईस मिलच्या कर्कश आवाजाने त्रास होत आहे. या परिसरातील ५० ते ६० कुटूंबियातील लोकांना सतत सुरु असलेल्या राईस मिलमुळे जगणे कठीण झाले. राईस मिलची निघणारी धूळ, राख आणि कोंडा हा या परिसरातील लोकांच्या घरात जात असल्याने त्रास होत आहे. या राईस मिलची अनेकदा प्रशासनाला तक्रार केली. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
दिवसभर उडणाऱ्या भुशाचा धूर हा शरीरावर वाढत असलेल्या कपडावर घरातील स्वयंपाक भांड्यांमध्ये पिण्याच्या पाण्यात छतावर दिवसभर उडत असतो यामुळे शरीराला त्रास होऊन त्वचा रोग वाढत चाललेला आहे. लोकांना आर्थिक व शारीरिक हानी सहन करावी लागत आहे . जेवण करताना जेवणाच्या पदार्थांमध्येही हा धूळ साचत असतो. त्यामुळे संपूर्ण दार बंद करूनच लोकांना जेवण करावे लागते. याबाबत परिसरातील महिलांनी ग्रामपंचायत कडे ही तक्रार केलेली होती. तेव्हा ग्रामपंचायत द्वारे मिल मालकाला धुराचा बंदोबस्त करण्याची ताकीद दिली. मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असून यामुळे आता योग्य ती कारवाई करून राईस मिल गावाबाहेर ढकलावी अशी मागणी केली आहे. तरी प्रदूषण नियंत्रण विभागाने व आरोग्य विभागाने याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. सोबतच राईस मिल आणि धान्य साठविण्यासाठी गोडाऊन असल्यामुळे उंदीर आणि घुशी चा त्रास परिसरातील लोकांना सहन करावा लागत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.