पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिसोरटी सोमनाथ समजल्या जाणाऱ्या बारामती तालुक्यातील सोमेश्वर मंदिरात आज लाखो भाविकांची गर्दी जमा झाली. आज श्रावणातला शेवटचा सोमवार असल्याने पहाटेपासूनच गर्दी सुरू झाली.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर मंदिरात सध्या श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवार निमित्ताने भक्तांची मोठी गर्दी केली आहे. काल दिवसभरात सुमारे एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी सोमेश्वराचे दर्शन घेतले. आजही पहाटे चार वाजल्या पासून भाविक दर्शन रांगा लावून उभे होते. प्रतिसोरटी सोमनाथ अशी ओळख असलेल्या या बारामती तालुक्यातील सोमेश्वर मंदिरात दिवसभर मोठी गर्दी दिसून आली.
राज्यभरातून आलेल्या भक्तांमुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. द्वापार युगात सती मालुबाई यांच्या वास्तव्याने या स्थानाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले. या मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.
श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच दर्शनासाठी दररोज हजारो भक्तांची वर्दळ असते. तसंच श्रावणी सोमवारचं निमित्त साधून दिवसभरात सुमारे एक ते दीड लाख भक्त येत असतात. श्रावण महिन्यात सुरू असलेल्या उत्सवामुळे मंदिराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालंय. आज या महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने दर्शनाची रांग तब्बल एक किलोमीटर अंतरापर्यंत गेली होती. भाविकांच्या सोयीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक दलाचे विद्यार्थी मदत करताना दिसत होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.