‘वॉटरटॅक्सी’चे दर पाहून प्रवासी अवाक

‘वॉटरटॅक्सी’चे दर पाहून प्रवासी अवाक

नवी मुंबईकरांचा मुंबईचा प्रवास अखेर वेगवान होणार आहे. नवी मुंबईकरांना मुंबईचा पल्ला गाठण्यासाठी एक ते दीड तास लागतो, मात्र आता जल वाहतूक सेवेमुळे (वॉटर टॅक्सी) नवी मुंबईकरांना कमी वेळेत मुंबईत जाता येणार आहे. दरम्यान, वॉटरटॅक्सी सुरू झाली आहे, मात्र वॉटरटॅक्सीचे दर पाहून प्रवासी अवाक झाले आहेत.

बेलापूर ते भाऊचा धक्का या प्रवासासाठी स्पीड बोट प्रति प्रवासी ८०० ते १२०० रुपये दर आकारण्यात येणार आहे. मात्र, या दरामुळे स्थानिक नागरिक तसेच बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांची महत्त्वाकांक्षा योजना असलेल्या वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

मुंबई ते नवी मुंबई वॉटरटॅक्सी सुविधा सुरु

वॉटरटॅक्सी सेवेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

मुंबई ते नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी, एलिफंटा वॉटर टॅक्सी सेवेला सुरुवात.

१० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या ७ स्पीडबोटी.

७ स्पीडबोटी आणि एक कॅटामरान बोट सेवेत.

नवी मुंबईहून मुंबईला पोहोचण्यासाठी स्पीड बोटीने ३० मिनिटे वेळ.

स्पीड बोटीसाठी प्रवाशांना प्रति व्यक्ती ७०० ते १२०० रुपये दर.

कॅटामरान बोटीला ४५ ते ५० मिनिटांचा कालावधी लागणार.

५६ प्रवासी क्षमता असलेल्या कॅटामरान बोटीकरीता प्रति प्रवासी २९० रुपये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version