मुलांना घरात सांभाळून पालक कंटाळले

मुलांना घरात सांभाळून पालक कंटाळले

राज्यात गेल्या दीड वर्षांत कोरोनाने हाहाकार माजवला. त्यामुळे सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली. तर विद्यार्थ्यांचे शिक्षणदेखील ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कोरोना परिस्थिती काही प्रमाणात स्थिरावल्यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. तसेच राज्यातील शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी वर्गासह पालकांमध्ये आनंदाचे चित्र पाहायला मिळाले.

मात्र आता, पुन्हा कोरोनासह ओमायक्रॉन विषाणूने डोकं वर काढले आहे. देशासह राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर खबदारी घेत मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. येत्या ३१ जानेवारीपर्यंत मुंबईतील पहिली ते नववी पर्यंतच्या शाळा बंद असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर पुन्हा ऑनलाईन शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.

ऑनलाईन शिक्षणपद्धती काही विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर ठरते. मात्र सामान्य विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मागील वर्षात कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण घेण्यात आले. ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना स्मार्टफोन, संगणक, योग्य इंटरनेट गुणवत्ता उपलब्ध नसल्यामुळे अडचणींना तोंड द्यावे लागते. तर विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला गांभीर्याने घेत नसल्याच्या बातम्यादेखील समोर आल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा महापालिकेच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयावर विद्यार्थीसह पालक संताप व्यक्त करत आहेत.

गेल्या दीड वर्षांत विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे पालकवर्ग कंटाळला होता. त्यानंतर कोरोना आटोक्यात आल्यानंतर शाळेचे दार विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले. मात्र आता कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा महामुंबईतील शाळा बंद करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक संताप व्यक्त करताना दिसत आहेत. महापालिकेने जाहीर केलेल्या शाळा बंदच्या निर्णयावर पालकांनी चिडचिड केली आहे. त्यामुळे आता ३१ जानेवारीनंतर शाळा सुरू होण्याबाबत काय निर्णय होईल, यावर सर्व विद्यार्थीसह पालकवर्गाचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version