बारामतीत कौटुंबिक वादातून वृद्ध आई-वडिलांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या नावावर असलेली जमीन विकल्याच्या कारणावरून दोन मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांशी वाद घालत त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत वृद्ध दाम्पत्याला दुखापत झाली असून, दोन्ही मुलांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
जमीन विक्रीच्या व्यवहारावरून सुरू झालेला वाद टोकाला गेल्याने कुटुंबातीलच व्यक्तींनी वृद्ध आई-वडिलांवर हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बारामतीत आईच्या नावावरील जमीन विकल्याच्या कारणावरून दोघा मुलांनी स्वतःच्या वृद्ध आई-वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (30 ऑगस्ट) रोजी सायंकाळी तरंगवाडी येथे आईच्या नावावरील जमीन का विकली? असा प्रश्न करत पोटच्या मुलांनी आई-वडीलांना लाकडी दांडक्याने मारहाण केली.
तसेच विकलेली जमीन परत घ्या, अन्यथा तुम्हाला आमचा हिसका दाखवतो, असे म्हणत दोघांनी आई-वडिलांना शिवीगाळ आणि दमदाटी करून जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संजय तुकाराम राऊत, राजेंद्र तुकाराम राऊत (दोघे रा. माळवाडी नं.2, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. तर तुकाराम किसन राऊत (वय 65, रा. सरस्वतीनगर, इंदापूर) असे फिर्याद देणाऱ्या त्यांच्या वडीलांचे नाव आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.