रुप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी; विठू-रखुमाईचा विवाह सोहळ्याचा थाट

रुप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी; विठू-रखुमाईचा विवाह सोहळ्याचा थाट

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

 

श्री विठठल रुक्मिणी मंदिरामध्ये आज विठू रखुमाईचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलाय.

यावेळी  संपूर्ण मंदिर विविध फुलांनी सजवण्यात आले होते. या विवाह सोहळ्याला शेकडो वर्षांची परंपरा असून, दरवर्षी वसंत पंचमीचे औचित्य साधून मंदिर समितीच्या वतीनं हा विवाह सोहळा साजरा केला जातो.

विवाह सोहळ्यासाठी श्री विठू रखुमाईच्या मूर्तींना नव वधू-वराप्रमाणे दागदागिने आणि भरजरी पोशाख घालून नटवण्यात आलं होतं. तर पाच मंगलअष्टका म्हणून तांदूळ आणि फुलांचा वर्षाव करण्यात आला.

सर्वसामान्यांचा विवाह सोहळा आपण पाहतो तसाच हा सोहळा लाखो भाविकांनी याची देही याची डोळा अनुभवला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version