पोलीस अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे बंदुकीतून गोळी सुटली अन्…

पोलीस अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे बंदुकीतून गोळी सुटली अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपुर

 

पंढरपुरात एका पोलीस अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागलीय. एका पोलीस अधिकाऱ्याच्या या निष्काळजीपणामुळे हा पोलीस अधिकारी जखमी झालाय.

पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या बंदोबस्तासाठी पोलीस ठाण्याच्या आवारातील कँटीनमध्ये काही पोलीस बसले होती. यावेळी पीएसआय बाळासाहेब जाधव यांच्या बंदुकीतून सुटलेली गोळी पीएसआय राजेंद्र कदम यांना लागली आणि ते जखमी झाले.

सुदैवानं यात राजेंद्र कदम बचावले. पीएसआय जाधवांकडून मिस फायरींग झाल्याची माहिती पीआय विठ्ठल दबडे यांनी दिली. दरम्यान जखमी राजेंद्र कदम यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version