दहशतवादी हल्ल्याचा पर्यटनावर परिणाम,जम्मू-काश्मीरमधील 80 ते 90 टक्के बुकिंग रद्द

हल्ल्याने काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे या आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये 80-90% बुकिंग रद्द करण्यात आले
दहशतवादी हल्ल्याचा पर्यटनावर परिणाम,जम्मू-काश्मीरमधील 80 ते 90 टक्के बुकिंग रद्द

जम्मू-काश्मीर: काश्मीरच्या शांत डोंगरदऱ्यांमध्ये पर्यटकांसाठी स्वर्ग मानल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला  घडलेला दहशतवादी हल्ला संपूर्ण देशाला हादरवून गेला. ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन परिसरात अतिरेक्यांनी अचानक गोळीबार करत पर्यटकांना लक्ष्य केले.

 या हल्ल्याने काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे या आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये 80-90% बुकिंग रद्द करण्यात आले असल्याची माहिती श्रीनगरमधील हॉटेल स्नोलँड, बुलेव्रॅड येथे माध्यमांना संबोधित करताना देशभरातील राष्ट्रीय टूर ऑपरेटर्सने दिली आहे.

त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिकांशी माध्यमांनी संवाद साधला असता त्यांना आतापर्यंत एवढ्या बुकिंग रद्द झाल्या याबाबत विचारलं असता घडलेल्या घटनेनंतर पर्यटनावर परिणाम होणं स्वाभाविक असल्याचं हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. 

नेमकं काय घडलं? 
जम्मू-काश्मीरमधील सुंदरतेने नटलेले पहलगाम आता एका भयावह घटनेमुळे चर्चेत आले आहे. 22 एप्रिलला अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्याजवळील टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी आहेत. हल्ल्यानंतर संपूर्ण भागात भीतीचे सावट पसरले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करण्या आधी धर्म विचारला गेला होता असं समोर आलं आहे. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version