पी चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ, जामीन याचिकेवर उद्या सुनावणी

पी चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ, जामीन याचिकेवर उद्या सुनावणी

INX मीडिया घोटाळा प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अंतरिम जामीन मिळावा यासाठी विनंतीचा अर्ज दाखल केला होता. याची दखल घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने कनिष्ठ न्यायालयाला दिल्यानंतर कनिष्ठ न्यायालयाने यावर सुनावणी घेतली. यामध्ये त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

INX मीडिया घोटाळा प्रकरण

INX मीडिया घोटाळा प्रकरणी  माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अंतरिम जामीन मिळावा यासाठी विनंतीचा अर्ज दाखल केला होता.  हा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. मात्र त्यांना तिहार तुरुंगात न पाठवता त्यांना घरी स्थानबद्ध करावे, असे आदेश देत सुप्रीम कोर्टाने चिदंबरम यांना तूर्तास दिलासा दिला.

मात्र काही वेळातच सीबीआय कोर्टाने आता उद्या म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी अंकरीम जामीनाच्या याचिकेवर सुनावणी होईल, असे सांगण्यात आलं आहे. चिदंबरम यांनी आपल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट दाखल करणे आणि कोठडीत पाठवण्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.

चिदंबरम यांना तिहार तुरुंगात पाठवले जाणार नाही आणि जर ट्रायल कोर्टात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला तर ते 5 सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीतच ठेवण्यात यावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने सुरुवातीला दिले आहेत.

सुनावणीच्या वेळी चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात सांगितले की, चिदंबरम ७४ वर्षांचे आहेत आणि त्यांना घरी स्थानबद्ध केले जाऊ शकते. यामुळे कोणाला काही समस्या नसायला हवी. मात्र चिदंबरम यांना अंतरीम जामीन मिळणार की नाही हे उद्या समजेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version