अमेरिकेच्या हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात २०० पेक्षा जास्त तालिबान दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामुळे तालिबानचं मोठं नुकसान झालं असून २०० पेक्षा जास्त तालिबानी दहशतवादी ठार झाले आहेत. याहल्ल्यात तालिबानच्या दहशतवाद्यांचा मोठ्या संख्येने शस्त्रसाठा, दारूगोळा आणि त्यांची १०० पेक्षा अधिक वाहनंदेखील नष्ट झाली आहेत.
अफगाणिस्तानच्या सुरक्षा मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तालिबानला रविवारी मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागलं. अफगाणिस्तान सुरक्षा मंत्रालयाचे अधिकारी फवाद अमान यांनी ‘आज सायंकाळी वायुसेनेकडून त्यांच्या सभा व लपून बसण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर, शेबर्गन शहरात २०० पेक्षा अधिक तालिबान दहशतवादी मारले गेले. हवाई हल्ल्यामुळे मोठ्यासंख्येने त्यांचा शस्त्रसाठा व दारूगोळा तसेच त्यांची १०० पेक्षा अधिक वाहने नष्ट झाली’, अशी माहिती ट्विट करत दिली आहे.
#Details: More than 200 terrorist Taliban were killed in #Cheberghan city after Air Forces targeted their gathering and hideouts today evening. A large amount of their weapons and ammunition and more than 100s of their vehicles were destroyed as a result of the airstrikes. — Fawad Aman (@FawadAman2) August 7, 2021
याआधी एका पाकिस्तानी दहशतवाद्यास गझनी प्रांतीय केंद्राबाहेरील भागात अफगाणिस्तानच्या कमांडो दलाकडून अटक करण्यात आली होती. त्याचा दहशतवादी कारवाया आणि नागरिकांच्या हत्यांमध्ये सहभाग होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.