ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आलं.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने छेडलेल्या राज्यव्यापी आंदोलनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. अनेकजण आदळआपट करत आहेत. पण त्याविषयी मी तुर्तास फार बोलणार नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
OBC व मराठा आरक्षणासाठी आंदोलन म्हणजे “आदळआपट” असं हीणवनं म्हणजे दोन्ही समाजांची चेष्टा करण्यासारखे आहे !
‘संघर्ष’ नको मग संवादातून मार्ग का काढत नाही ? @OfficeofUT @CMOMaharashtra — Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 26, 2021
विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. ‘भाजपने काल संपूर्ण राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणासाठी प्रचंड संघर्ष उभा केला, आंदोलन केलं. मात्र या आंदोलनाला आदळआपट म्हणणं म्हणजे आंदोलकांची किंबहुना ज्या समाजाच्या न्यायहक्कांसाठी भाजपकडून संघर्ष करण्यात आला. त्यांचा अपमान करण्यासारखी किंवा चेष्टा करण्यासारखी गोष्ट आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलन म्हणजे ‘आदळआपट’ असं हिनवणं म्हणजे दोन्ही समाजांची चेष्टा करण्यासारखे आहे!’, असं प्रवीण दरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
‘संघर्ष कधी करावा, संवादाने प्रश्न सुटतील असे मुख्यमंत्री सांगत असताना, आपण संवाद करत आरक्षणाचा विषय का मार्गी लावला नाही?, असा सवालही दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.