तात्काळ पासपोर्ट अवघ्या तीन दिवसांत; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

तात्काळ पासपोर्ट अवघ्या तीन दिवसांत; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पासपोर्टसाठी दिवसेंदिवस वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तात्काळ पासपोर्ट आता नागरिकांना अवघ्या तीन दिवसात मिळणार आहे. तात्काळ पासपोर्टसाठी क्लास वन श्रेणीतील अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या सत्यप्रतीच्या प्रमाणपत्राची अट विदेश मंत्रालयाने शिथील केली आहे.

सगळ्या कागदपत्रांची योग्य पूर्तता झाल्यानंतर पासपोर्ट बनल्यावर पोलीस रिपोर्ट मागवण्यात येईल. तात्काळ पासपोर्ट काढण्यासाठी साधारण 3500 रूपयांपर्यंत खर्च येणार आहे. त्यामुळे आता पासपोर्टसाठी जास्त वेळ वाट पाहण्याची गरज लागणार नाही. मात्र, सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version