विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष सज्ज झाली असून जगावाटपाची तयारी सुरू झाली आहे. आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी आम्हाला 23 जागा देण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांच्याकडे यादीद्वारे देण्यात आले आहे. सेना आणि भाजपाने 10 जागा द्याव्यात असेही रामदास आठवले म्हणाले आहेत.
आरपीआयने सेना आणि भाजपाकडे 10 जागांची मागणी केली आहे.
राजे आणि महाराजे भाजपामध्ये येत असून आता आमच्याकडे नेते पाठवा आम्ही त्यांना निवडून देऊ असे रामदास आठवले म्हणाले.
यापूर्वी भाजपा आणि सेनेत प्रवेश करण्यास तयार नव्हते. मात्र आता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये जाण्यास नकार देत आहे.
पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी युद्ध करण्यापूर्वी पाकव्याप्त काश्मीर आम्हाला द्या असे रामदास आठवले यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.