मुंबई : पावसाळ्यात जागोजागी दरडी कोसळ्याच्या घटना घडल्याचे पाहालया मिळते. नुकतेच घाटकोपरमध्ये दरड कोसळून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या विषयावर महत्त्वाची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी त्यांच्या एक्स पोस्टद्वारे दिली आहे. गेल्या १५ वर्षांपासून मुंबई दरडी कोसळ्याच्या घटनांसाठी उपाययोजनाच नसल्याचे गलगली यांनी म्हटले आहे. तर अजूनही अनेक घर हे धोकादायक स्थितीत असल्याचेही त्यांनी नमदू केले. गलगली सांगतात की, मुंबईतील दरडी कोसळून होणारी जीवित आणि वित्त हानी नवीन नसून मागील 15 वर्षांपासून दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटनेवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही. मागील 34 वर्षात दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत 340 लोकांचा मृत्यू झाला असून 300 हून अधिक नागरिक जखमी झाले. मुंबईतील 36 पैकी 25 मतदारसंघात 257 ठिकाण डोंगराळ भागात धोकादायक म्हणून वर्गीकृत आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले की, या भागातील 22,483 झोपड्यांपैकी 9657 झोपड्यांना प्राधान्याने स्थानांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने राज्य शासनाला केली. यात उर्वरित झोपड्यांना टेकड्यांच्या आजूबाजूला तटबंदी बनवून संरक्षित करण्याचे प्रस्तावित केले होते. पावसाळयात भूस्खलनामुळे 327 ठिकाणाबाबत अनिल गलगली यांनी महाराष्ट्र सरकारला आधीच सतर्क केले होते.
तसेच वर्ष 1992 ते 2026 या दरम्यान दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 340 लोकांनी जीव गमावला असून 300 हून अधिक जखमी झाले आहेत. 2010 मध्ये सर्वसमावेशक सर्वेक्षण करणार्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने शिफारस केली होती. त्यावर वेळीच कार्यवाही झाली असती तर डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूला रोखता आले असते. मंडळाचा अहवाल आणि अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यानंतर 1 सप्टेंबर 2011 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. तथापि, त्यानंतर 15 वर्षे उलटून गेली आहेत परंतु नगरविकास विभाग अद्याप त्याची अंमलबजावणी करीत आहे, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याप्रमाणे यापैकी कोणतीही अॅक्शन टेकिंग प्लॅन (एटीपी) तयार केलीच नाही, असेही गलगली म्हणाले.
15 वर्षांपासून मुंबईत दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटनेवर उपाययोजना नाही 22,483 कुटूंब राहत आहेत धोकादायक ठिकाणी मुंबईतील दरडी कोसळून होणारी जीवित आणि वित्त हानी नवीन नसून मागील 15 वर्षांपासून दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटनेवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही. मागील 34… pic.twitter.com/k9jjsuohI8 — ANIL GALGALI (@ANILGALGALIRTI) August 12, 2026
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.