‘लोणी, तुपाची आयात नको’

‘लोणी, तुपाची आयात नको’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय पशुसंवर्धन, डेअरी आणि मत्स्य विभागाचे मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना दुग्ध उत्पादनांच्या आयातीसंदर्भात एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी दूध उत्पादकांना फटका बसेल असा निर्णय घेऊ नये. तसेच त्याबाबत विचार करावा अशी मागणी केली आहे.

शरद पवारांनी पत्रात म्हटले की, दूध उत्पादक शेतकरी सध्या करोना संसर्गाने निर्माण झालेल्या संकटातून सावरत आहे. केंद्र सरकारचा अशा प्रकारचा निर्णय दूध व्यवसाय पुन्हा उभारी घेत असताना झाल्यास त्यावर विपरित परिणाम होऊ शकतो, अशात केंद्र सरकारने जर लोणी आणि तूप यांसारखे पदार्थ आयात करण्याचा निर्णय घेतला तर या सगळ्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे मी जी चिंता व्यक्त करतो आहे ती गांभीर्याने घ्या आणि कृपा करून हा निर्णय मागे घ्या असे त्यांनी पत्रात म्हटले.

दरम्यान, केंद्राने घी आणि बटर परदेशातून आयात केल्यास त्याचा देशांतर्गत दूध उत्पादकांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होईल, असं मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध उत्पादन खात्याचे मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना उद्देशून शरद पवार यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी केंद्राला घी आणि बटरचे आयात न करण्याचा सल्ला दिला आहे. ‘देशांतर्गत दूध उत्पादक आत्ता कुठे कोविडच्या परिस्थितीतून हळूहळू सावरत असून या निर्णयामुळे भारतातील डेअरी उद्योगाला मोठा फटका बसेल’, असं शरद पवार यांनी म्हणालं आहे.

‘सद्यस्थितीत देशात दुधाचा तसा तुटवडा नाही. दूध पावडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. परंतु बटर आणि तूप या दुग्धजन्य पदार्थांचा साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत मात्र कमी उपलब्ध आहे. दक्षिणेकडील राज्यांमधील दूध उत्पादनाचा हंगाम सध्या सुरू झाला आहे. या राज्यांमधील दुधाची आवक पाहिल्यानंतर आवश्यकता भासल्यास केंद्र सरकार यात हस्तक्षेप करून बटर आणि तूप या दोन दुग्धजन्य पदार्थांची आयात करेल’ अशी माहिती सिंह यांनी दिली. जागतिक बाजारात सध्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढलेल्या असल्याने आत्ताच बटर आणि तुपाची आयात करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी २०११ साली केंद्र सरकारने दूध उत्पादनांची परदेशातून आयात केली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version