‘त्या’ बारा जिल्हाधिकाऱ्यांना अटक करुन हजर करा – एनजीटीने दिले आदेश

‘त्या’ बारा जिल्हाधिकाऱ्यांना अटक करुन हजर करा – एनजीटीने दिले आदेश

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

राज्यातील बारा जिल्हाधिका-यांना अटक करून हजर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिले आहेत. फ्लोराइडमिश्रित पाण्यामुळे होणा-या फ्लोरोसिस आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी दिलेल्या आदेशांचे पालन न केल्याने हा आदेश देण्यात आला. त्याचे जामीनपात्र वॉरंट संबंधित जिल्हा पोलीस अधिक्षकांना पाठवले आहे.

यामध्ये नांदेड, चंद्रपूर, बीड, यवतमाळ, लातूर, वाशीम, परभणी, हिंगोली, जालना, जळगाव, नागपूर व भंडारा येथील जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात  पाण्यासाठी बोअरवेलचे प्रमाण अधिक आहे. दोन बोअरवेलमधील अंतर, खोली याबाबतचे नियम आहेत. मात्र, त्यांचे पालन होत नाही. याविरुद्ध अ‍ॅड. असीम सरोदे यांनी 2013 साली याचिका दाखल केली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version