Ganeshotsav 2026 : मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी नवे नियम, आता वन विंडो क्लिअरन्सने मिळणार या परवानग्या; कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

Ganeshotsav 2026 : मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी नवे नियम, आता वन विंडो क्लिअरन्सने मिळणार या परवानग्या; कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सवाचा सण आला आहे. जागोजागी लहान – मोठ्या मुर्तीकारांनी आपले तंबू बांधले आहेत. तर मोठमोठ्या मंडळांची तयारी सुरू झाली आहे. अशातच मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यासंदर्भात आज, मंगळवारी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची बैठक पार पडली असून यामध्ये या नियमांवर चर्चा करण्यात आली. याप्रमाणे आता गणेशोत्सव मंडळांना वन विंडो क्लिअरन्समध्ये वाहतुकीची आणि पोलिसांची परवानगी मिळणार आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी वाहतूक विभागाला तशा सूचना दिल्या. तसेच मुंबईतील सर्व गणेशोत्सव मंडळांना मंत्री लोढा यांनी ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाचे चलचित्र आणि देखावे तयार करण्याचे आवाहन केले आहे. यानुसार ड्रग्ज फ्री होण्याची प्रतिज्ञा घेत, नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहनही केले आहे.

हेही वाचा : Crime News : गुंता वाढला! टेकडीच्या पायथ्याशी बाईक, लॅपटॉप हिस्ट्रीत जीवन संपवण्याचे पर्याय सर्च; बेपत्ता IIT इंजिनिअरबाबत धक्कादायक खुलासे

यासंबंधी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माहिती दिली की, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज नाना चौक येथील BMC डी विभाग सभागृहात गणेशोत्सव मंडळे व विविध प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त समन्वय बैठक घेतली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर जनजागृती करण्याची परंपरा राहिली आहे. यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी मंडळांनी आपल्या देखावे व सजावटीच्या माध्यमातून हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले. गणेशोत्सव मंडळांना परवानग्यांसाठी वेगवेगळ्या विभागांकडे जावे लागू नये आणि प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी महापालिका, पोलीस आणि वाहतूक पोलिसांची परवानगी ‘वन विंडो’ पद्धतीने मिळावी, अशी मागणी मंडळांनी केली. यावर संबंधित विभागांनी समन्वयाने तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या.

प्रत्येक गणेशभक्ताला आपल्या गणरायाचे विसर्जन भव्य आणि भावपूर्ण वातावरणात व्हावे, अशी इच्छा असते. त्यामुळे छोट्या कृत्रिम तलावांसोबतच नैसर्गिक तलावाप्रमाणे भासणारे विस्तृत कृत्रिम तलाव तयार करण्याच्या दृष्टीने ऑगस्ट क्रांती मैदानावर ५ ते ६ फूट उंचीचा विस्तृत कृत्रिम तलाव उभारण्याबाबत सूचना दिल्या. तसेच इतर विसर्जनस्थळांचीही पाहणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version