बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दिन सिद्दीकीच्या वकिलाला अटक

बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दिन सिद्दीकीच्या वकिलाला अटक

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दिन सिद्दीकी यांचा वकील रिझवान सिद्दीकी याला शुक्रवारी रात्री ठाणे गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली आहे. मोबाइल कंपन्यांमधील सीडीआर म्हणजेच कॉल डिटेल्स रेकॉर्ड बेकायदा पद्धतीने काढून घेऊन त्याची विक्री केल्याप्रकरणी रिझवान सिद्दीकी यांना मुंबईत अटक केलीय.

नवाझुद्दिन सिद्दीकी याने त्याच्या पत्नीचे मोबाइलचे सीडीआर या वकिलामार्फत मिळविले असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. वकील रिझवान याची याआधीही ठाणे गुन्हे शाखेने चौकशी केली होती. अभिनेते नवाझुद्दिन सिद्दीकी यालाही ठाणे गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र तो चौकशीसाठी उपस्थित राहिलेला नाही.

सीडीआर प्रकरणी आतापर्यंत खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह 11 जणांना अटक करण्यात आली होती. चुकीच्या पद्धतीनं फोन कॉल्स रेकॉर्ड करून संभाषण लीक करण्यासंबंधात रिजवान सिद्दीकी यांना अटक करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version