नवाब मलिकांना तुर्तास दिलासा नाही

नवाब मलिकांना तुर्तास दिलासा नाही

राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी जामीन देण्याची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाने नवाब मलिक यांना तातडीने दिलासा देण्यास नकार दिला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पदरी निराशा पडली आहे. न्यायालयाने नवाब मलिक यांना नव्याने अर्ज करण्यास सांगितला असून त्यावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

दरम्यान, न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी अनिल देशमुखांच्या याचिकांवर सुनावणी करण्यास यापूर्वीच नकार दिला आहे. त्यामुळे सध्या फक्त नवाब मलिकांच्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. या निकालावर अनिल देशमुखांचं मतदानाचं भवितव्य अवलंबून होतं. जर मलिकांना परवानगी मिळाली असती तर हा निकाल घेऊन अनिल देशमुख अन्य न्यायमूर्तींपुढे दाद मागणार होते. पण नवाब मलिकांनाच परवानगी नाकारण्यात आल्यामुळे आता अनिल देशमुखांनाही मतदान करता येणार नाही.

मुंबई सत्र न्यायालयानं अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकीची परवानगी नाकारल्यानंतर दोघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नवाब मलिकांना याचिकेत सुधारणा करून पुन्हा दाद मागण्याची परवानगी मागितली. याचिकेतील जामीनाचा मुद्दा काढून केवळ बंदोबस्तात मतदानाची परवानगी देण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर आता थोड्यावेळात नव्या याचिकेसह पुन्हा सुनावणी होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version