राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा विनोद तावडेंवर गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा विनोद तावडेंवर गंभीर आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मंत्रालयातून सगळ्या राज्याचा कारभार हकला जातो. महत्वाचे निर्णय, ठराव पारित करणं, निधी मंजुरीचे निर्णय इथूनच घतले जातात. परंतु निधी मंजूर करण्यासाठी पैशांची देवाणघेवाण होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

 

हा पैशांच्या देवाणघेवाणीचा सगळा कारभार शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यालयातला असल्याचाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

 

तब्बल 2 कोटी 20 लाख रूपयांची कामं कोणतीही मान्यता नसताना मंजूर झाली होती. अल्पसंख्यांक विभागाचे कक्ष अधिकारी शांताराम साळुंखे आणि विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. चारुदत्त शिंदेंच्या वादातून हा भ्रष्टाचार आताचव्हाट्यावर आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version