Navi Mumbai Crime: 150 रुपयांचा वाद, प्रवाशांना अर्ध्या रस्त्यात उतरवलं; रागाच्या भरात 18 वर्षीय रिक्षाचालकाची हत्या, नंतर रिक्षा…

वाशीतील मिनी सीशोर येथे 18 वर्षीय रिक्षाचालकाची भाड्याच्या वादातून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
Navi Mumbai Crime: 150 रुपयांचा वाद, प्रवाशांना अर्ध्या रस्त्यात उतरवलं; रागाच्या भरात 18 वर्षीय रिक्षाचालकाची हत्या, नंतर रिक्षा…

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाशी परिसरात रिक्षाभाड्याच्या किरकोळ वादाचे भीषण रूप धारण करत 18 वर्षीय रिक्षाचालकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिनी सीशोर परिसरात धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून करण्यात आला. या प्रकरणाचा वेगाने तपास करत वाशी पोलिस आणि गुन्हे शाखेने अवघ्या 48 तासांत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

मृत रिक्षाचालकाचे नाव सुजनकुमार असून, तो कोपरखैरणे येथून प्रवाशांना घेऊन मानखुर्दच्या दिशेने निघाला होता. प्राथमिक माहितीनुसार, प्रवासाचे भाडे 150 रुपये सांगितले असताना प्रवाशांनी 100 रुपये देण्याचा आग्रह धरला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.

हेही वाचा: Crime News : पार्टीत चिकनचे पीस जास्त खाण्यावरून वाद… आरोपीने मित्राला चाकू भोसकून संपवलं

दरम्यान, सुजनकुमारला फोनवर दुसरे भाडे मिळाल्यानंतर त्याने मानखुर्दला जाण्यास नकार देत दोन्ही प्रवाशांना रिक्षातून उतरून जाण्यास सांगितले. याच गोष्टीचा राग मनात धरून दोघांनी त्याच्यावर हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी धारदार शस्त्राने सुजनकुमारवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी रिक्षा घेऊन तेथून पसार झाले.

घटनेनंतर वाशी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक पुरावे आणि विविध धागेदोरे जोडत संशयितांचा माग काढला. या तपासाच्या आधारे साहिल सुर्वे आणि साहिल खरात या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

हेही वाचा: Phaltan Doctor News : फलटणमधील आणखी एका डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल! सायन स्टेशनवरच घडला धक्कादायक प्रकार 29 ऑगस्टला इन्स्टाग्राम व्हिडिओद्वारे..

सध्या आरोपींकडे चौकशी सुरू असून हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र, घटनाक्रम आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे नवी मुंबईत खळबळ उडाली असून, किरकोळ भाड्याच्या वादातून एका तरुणाचा जीव गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version