नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव द्या – काँग्रेस

नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव द्या – काँग्रेस

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी काँग्रेस करत आहे. भाजपा पाठोपाठ आता काँग्रेसही नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्याची मागणी करत आहेत. मात्र, दुसरीकडे विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावासाठी आग्रही आहेत.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपा पाठोपाठ काँग्रेसही विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नावाची मागणी करत आहेत. तसेच ठाणे, नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्रसुद्धा विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नावासाठी आग्रही आहेत. तर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही आहेत.

दि.बा. पाटील यांची राजकीय कारकीर्द

दि.बा. पाटील यांनी पनवेलमधून नगराध्यक्ष, पनवेल उरण विधानसभा मतदारसंघातून 4 वेळा, रायगड लोकसभा मतदारसंघातून 2 वेळा खासदार आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अशी अनेक पदे भूषवली आहे. तसेच त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे त्यांच्या धडाकेबाज कार्यामुळे त्यांना सर्वोत्कृष्ठ संसदपटूचा किताबही दिबांना देण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version