Ashok Kharat Case: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात आता ‘इन्कम टॅक्स’च्या रडारवर! 52 सातबारा उतारे अन् कोट्यवधींची मालमत्ता उघड

नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटी चौकशीनंतर आयकर विभागानेही तपास सुरू केला आहे.
Ashok Kharat Case: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात आता ‘इन्कम टॅक्स’च्या रडारवर! 52 सातबारा उतारे अन् कोट्यवधींची मालमत्ता उघड

नाशिक: श्रद्धेचा बाजार मांडून अध्यात्माच्या नावाखाली वासनेचा आणि काळ्या पैशांचा महाल उभारणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातच्या पापांचा घडा आता पूर्णपणे भरला आहे. केवळ निष्पाप महिलांचे लैंगिक शोषण करून हा बाबा थांबला नाही, तर त्याने भक्तीच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहारांचे एक महाकाय जाळे विणल्याचे आता उघड होत आहे. ‘एसआयटी’च्या धडक कारवाईनंतर आता या प्रकरणात ‘आयकर विभागा’ने थेट एंट्री घेतल्याने या भोंदूबाबाच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्त्वाखालील ‘एसआयटी’ने या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी कंबर कसली आहे. शनिवारी या विशेष तपास पथकाने खरातला कार्यालयात बोलावून त्याची तब्बल सात तास कसून चौकशी केली. या मॅरेथॉन चौकशीत त्याचे जबाब नोंदवण्यात आले असून अनेक तांत्रिक पुरावेही गोळा करण्यात आले आहेत.

याच दरम्यान, खरातच्या आर्थिक साम्राज्याची व्याप्ती आणि गुंतागुंत पाहता आता आयकर विभागानेही या तपासात उडी घेतली आहे. त्यामुळे आता केवळ त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचाच नव्हे, तर कोट्यवधींच्या काळ्या कमाईचाही हिशोब चुकता केला जाणार आहे.

हेही वाचा: Rohit Sharma: मुंबई इंडियन्सचा ‘मिशन 6’ साठी शंखनाद! 29 मार्चला वानखेडेवर केकेआरशी भिडणार; रोहित शर्माने चाहत्यांना दिले मोठे वचन

तपासादरम्यान हाती लागलेली माहिती चक्रावून टाकणारी आहे. या भोंदूबाबा आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर तब्बल 52 ‘सातबारा’ उतारे आढळून आले आहेत. विशेष आणि संतापजनक बाब म्हणजे, यातील काही सामायिक सातबारा उताऱ्यांवर थेट अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांची नावे झळकत आहेत. “कुंपणानेच शेत खाल्ले” अशीच काहीशी ही स्थिती असून, या अधिकाऱ्यांचे आणि खरातचे नेमके काय आर्थिक लागेबांधे होते, याची आता कसून चौकशी होणार आहे. जमिनीचे हे सर्व संशयास्पद व्यवहार आता पोलिसांच्या आणि आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत.

भोंदूगिरीच्या या दुकानातून आलेला काळा पैसा नेमका कुठे गुंतवला? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आयकर विभागाने मोठ्या व्यवहारांचे ‘लिंकिंग’ करत संयुक्त तपास सुरू केला आहे. खरातच्या उत्पन्नाचे मूळ स्रोत, त्याने आतापर्यंत भरलेली आयकर विवरणपत्रे आणि प्रत्यक्षातील त्याची अफाट मालमत्ता यांची आता बारकाईने सांगड घातली जाणार आहे. तसेच, बँक व्यवहार, रोख रकमेच्या हालचाली आणि भक्तांकडून किंवा ग्राहकांकडून उकळलेल्या तथाकथित ‘फी’च्या पावत्याही तपासल्या जाणार आहेत.

या नव्या आणि निर्णायक वळणामुळे आता केवळ अशोक खरातच नव्हे, तर त्याला आर्थिक रसद पुरवणारे छुपे देणगीदार, त्याचे व्यावसायिक भागीदार आणि त्याला पाठीशी घालणारे पांढरपेशे समर्थकही रडारवर आले आहेत. श्रद्धेच्या नावाखाली उभारलेल्या या भ्रष्ट साम्राज्याचे एक-एक काळे पान आता उलगडत आहे. आगामी काळात या तपासातून नाशिकमधील अनेक बडे चेहरे उघड होण्याची दाट शक्यता असून, खरातचे हे आर्थिक जाळे किती खोलवर रुजले आहे, याचा मोठा भूकंप लवकरच राज्यात होईल.

हेही वाचा: Air India Fitness Policy: एअर इंडियाच्या विमानात आता फक्त ‘फिट’ कर्मचारीच दिसणार; BMI चुकला तर थेट…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version