Nashik: अग्निवीर प्रशिक्षण घेत असताना बॅरेकमध्ये टोकाचं पाऊल; 20 वर्षीय प्रशिक्षणार्थीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीर प्रशिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय युवकाचा बॅरेकमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू झाला. घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांचा तपास सुरू आहे
Nashik: अग्निवीर प्रशिक्षण घेत असताना बॅरेकमध्ये टोकाचं पाऊल; 20 वर्षीय प्रशिक्षणार्थीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीर प्रशिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय प्रशिक्षणार्थीने बॅरेकमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेमुळे आर्टिलरी सेंटर परिसरात खळबळ उडाली आहे. अश्विन एम. असे मृत प्रशिक्षणार्थीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अश्विन एम. हा नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीर म्हणून प्रशिक्षण घेत होता. प्रशिक्षणादरम्यान तो आर्मी बॅरेकमध्ये वास्तव्यास होता. गुरुवारी सकाळी बॅरेकमध्ये त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. बॅरेकमधील पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला.

ही बाब लक्षात येताच सहकाऱ्यांनी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याला उपचारासाठी देवळाली कॅम्प येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. लेफ्टनंट कर्नल पंकज कुमार यांनी अश्विनला तपासून मृत घोषित केल्याची माहिती आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही या प्रकरणाची नोंद केली. नाशिकमधील उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार झाडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, अश्विनने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे. बॅरेकमधील परिस्थिती, प्रशिक्षणाशी संबंधित बाबी तसेच इतर संभाव्य कारणांचा तपास केला जात असल्याची माहिती आहे.

अश्विनच्या मृत्यूमुळे त्याच्या सहकाऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांच्या तपासातून या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version