Nasa Artemis II Mission: 53 वर्षांची प्रतीक्षा संपली! अखेर मानवाने चंद्राचा अदृश्य भाग पाहिला; फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल

नासाच्या आर्टेमिस II मोहिमेतून चंद्राचा अदृश्य भाग प्रथमच पाहायला मिळाला असून 53 वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राजवळ पोहोचला आहे ही मोहीम अंतराळ संशोधनासाठी महत्त्वाची ठरत आहे
Nasa Artemis II Mission: 53 वर्षांची प्रतीक्षा संपली! अखेर मानवाने चंद्राचा अदृश्य भाग पाहिला; फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Nasa Artemis II Mission: अमेरिकेची अंतराळ संस्था नासा पुन्हा एकदा आपल्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेमुळे चर्चेत आली आहे. आर्टेमिस II या मोहिमेदरम्यान अंतराळवीरांनी चंद्राचा असा भाग कॅमेऱ्यात कैद केला आहे, जो पृथ्वीवरून कधीच दिसत नाही. सुमारे 53 वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राजवळ पोहोचत असल्याने ही घटना ऐतिहासिक ठरत आहे.

या मोहिमेतून पाठवण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये चंद्राच्या दूरच्या भागाचे स्पष्ट दर्शन घडते. या फोटोमध्ये चंद्राच्या कडेला असलेले एक विशाल क्षेत्र दिसून येते, ज्याला ‘ओरिएंटल बेसिन’ असे म्हटले जाते. या भागाचे इतक्या जवळून आणि स्पष्टपणे दर्शन याआधी कधीच झाले नव्हते. त्यामुळे या छायाचित्रांना वैज्ञानिकदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

या मोहिमेत चार अंतराळवीर सहभागी झाले आहेत. त्यामध्ये कॅनडाचे जेरेमी हॅनसेन आणि अमेरिकेचे व्हिक्टर ग्लोव्हर, रीड वाईसमन आणि क्रिस्टीना कोच यांचा समावेश आहे. हे सर्व अंतराळवीर ‘ओरियन’ या अंतराळयानातून चंद्राभोवती प्रवास करत आहेत. या मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे क्रिस्टीना कोच या चंद्र मोहिमेत सहभागी होणाऱ्या पहिल्या महिला ठरणार आहेत, तर व्हिक्टर ग्लोव्हर हे या मोहिमेचा भाग असलेले पहिले अश्वेत अंतराळवीर आहेत

आर्टेमिस II मोहिमेचा मुख्य उद्देश चंद्राच्या त्या भागाचा अभ्यास करणे आहे, जो पृथ्वीवरून कधीच दिसत नाही. या भागाला ‘फार साइड ऑफ द मून’ असे म्हटले जाते. ही मोहीम 1972 मधील अपोलो 17 मोहिमेनंतरची पहिली मानवी चंद्राभोवतीची मोहीम असल्याने तिचे महत्त्व अधिक वाढले आहे. सुमारे 10 दिवस चालणाऱ्या या मोहिमेत अंतराळवीर चंद्राला वळसा घालून पुन्हा पृथ्वीवर परतणार आहेत.

मोहिमेची सुरुवात यशस्वी झाली असली तरी काही तांत्रिक अडचणीही समोर आल्या आहेत. ‘ओरियन’ अंतराळयानातील टॉयलेट सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने अंतराळवीरांना काही काळ पर्यायी उपायांचा वापर करावा लागला. तज्ञांच्या मते, सिस्टीममध्ये बर्फ साचल्यामुळे ही अडचण निर्माण झाली होती. मात्र, ही समस्या गंभीर नसून यान पूर्णपणे सुरक्षित असल्याचे नासाने स्पष्ट केले आहे.

ही मोहीम नासाच्या भविष्यातील मोठ्या योजनेचा भाग आहे. आगामी काळात मानवाला चंद्रावर अधिक काळ राहता येईल का, याचा अभ्यास या मोहिमेद्वारे केला जात आहे. तसेच 2028 पर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळवीरांना उतरवण्याचे उद्दिष्टही नासाने ठेवले आहे.

आर्टेमिस II मोहीम ही केवळ एक अंतराळ प्रवास नसून भविष्यातील अंतराळ संशोधनासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. चंद्राच्या अदृश्य भागाचे पहिले दर्शन घडवणारी ही मोहीम विज्ञान क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी ठरत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version