प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाला केले समाजातून बहिष्कृत; पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना

प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाला केले समाजातून बहिष्कृत; पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली आहे. प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाला समाजातून बहिष्कृत करण्यात आलंय.

याप्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नंदुरबार तालुक्यातील करजकुपा गावातील धनंजय पाटील याने गावातील एकाच गोत्रातील मुलीशी प्रेम विवाह केलाय.

त्यामुळे गावातील लोकांनी धनंजय पाटीलला समाजातून बहिष्कृत केलंय. नंदुरबार उपनगर पोलीस स्टेशनमध्ये सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्या नुसार 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version