नाना पटोलेंचे वक्तव्य हास्यास्पद – अजित पवार

नाना पटोलेंचे वक्तव्य हास्यास्पद – अजित पवार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला असल्याचे वक्तव्य केले होते. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत नाना पटोलेंचा खरपूस समाचार घेतला आहे. नाना पटोलेंचे वक्तव्य हास्यास्पद असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.

अजित पवार म्हणाले, नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला असल्याचे वक्तव्य केले. मात्र, पटोलेंचे हे वक्तव्य हास्यास्पद आहे. नाना पटोले भाजपमध्ये होते. तेवढ्या वेळेपुरतं हेडलाईन मिळवण्यासाठी हे वाक्य त्यांना बरोबर वाटत असेल. परंतु, संघटनेत प्रत्येक पक्ष आपापल्या परिने काम करत असंत, असा टोला पवारांनी पटोलेंना लगावला. तसेच नाना पटोले भाजपमधूनच काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यामुळे भाजपने म्हणायचं की त्यांनी पाठीत खंजीर खुपसलं, असाही टोला यावेळी पवारांनी लगावला.

तसेच पुढे ते म्हणाले, आमचं महाविकास आघाडीचे सरकार आहे. या मविआ सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस एकत्र काम करत आहे. राज्यासह देशस्तरावर निर्णय घेत असताना राष्ट्रीय पातळीवरचे नेते निर्णय घेतात. काँग्रेसने काही तालुक्यांमध्ये भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. मात्र, मी त्याला महत्त्व देत नाही. मात्र, नेत्यांनी वक्तव्य करताना आपण काय बोलतो तसेच आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघून वेडावाकडा परिणाम होणार नाही याची काळजी घ्याववी. तसेच नेत्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याचेही अजित पवार म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version