Nalasopara Crime: मुलींशी छेडछाडीला विरोध करणं पडलं महागात? नालासोपाऱ्यात पिता-पुत्रावर कोयत्याने हल्ला, मुलाची प्रकृती गंभीर

नालासोपारा पूर्वेतील श्रीरामनगरमध्ये पिता-पुत्रावर कोयत्याने हल्ला झाल्याने खळबळ उडाली. अतीफ खान गंभीर जखमी असून वडील शेरू खान बचावले. पोलिसांकडून तपास सुरू आहे
Nalasopara Crime: मुलींशी छेडछाडीला विरोध करणं पडलं महागात? नालासोपाऱ्यात पिता-पुत्रावर कोयत्याने हल्ला, मुलाची प्रकृती गंभीर

नालासोपारा: नालासोपारा पूर्वेकडील श्रीरामनगर परिसरात पिता-पुत्रावर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या हल्ल्यात शेरू अहमद खान आणि त्यांचा मुलगा अतीफ खान हे दोघे जखमी झाले असून, अतीफ यांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामनगर परिसरात एका मदरशातील मुलींशी छेडछाडीचे प्रकार होत असल्याची तक्रार काही नागरिकांकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शेरू अहमद खान आणि त्यांचा मुलगा अतीफ संबंधित व्यक्तींना समज देण्यासाठी गेले होते. याचवेळी अजीज आणि अज्जू या दोघांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.हल्ल्यात धारदार कोयत्याचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दोघांनाही गंभीर दुखापत झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा: Crime News : निर्माणाधीन इमारतीत रील बनवणं जीवावर बेतलं; सुरक्षारक्षकाने चोर समजून झाडली गोळी, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

मुलाची प्रकृती गंभीर

या घटनेत अतीफ खान यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर शेरू खान यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील परिस्थितीचा आढावा घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, हल्लेखोर आणि जखमी यांच्यात पूर्वी काही वाद होता का, याचीही चौकशी केली जात आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version