जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
दिग्दर्शक नागराज मंजूळे यांच्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
मंजूळे यांच्या आगामी ‘झुंड’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी विद्यापीठाचे मैदान भाड्याने देण्यात आले आहे. अशाप्रकारे मैदान भाड्याने देऊन लीजच्या कराराचा भंग केल्याचा ठपका पुणे शहर तहसील कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विद्यापीठावर कारवाई होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाने मंजूळेंना चित्रीकरणासाठी सेट उभारण्यास मैदान भाड्याने दिले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.