जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
नागपूरमध्ये अपहरण, हत्या सत्र सुरु असतांना पोलिसांनी वाढदिवसांची पार्टी साजरी केल्याचे समोर आले आहे. नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाण्यात सहकार्याच्या बर्थडे पार्टीसाठी फटाके फोडले.
शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजता पोलिसांनी फटाक्यांची आतषबाजी करत बॅण्ड तालावर ठेका धरला. नागपूरमध्ये हत्या सत्र सुरु असलेल्या नागपूरमध्ये आरोपी मोकाट तर पोलीस सैराट असल्याचे चित्र दिसून आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.