‘नागिन’ फेम अदा खान बनली सायबर क्राईमची शिकार

‘नागिन’ फेम अदा खान बनली सायबर क्राईमची शिकार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सामान्य माणूसच नाही तर आता सेलब्रिटीजना सुद्धा सायबर क्राइमला सामोरे जावे लागत आहे. अशीच एक चकीत करणारी बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावर काम करणारी कलाकार अदा खानची कोणी अज्ञात व्यक्तीने कार्डस द्वारे पैशांची फसवणूक केली.

 कलर्स चॅनलवरील ‘नागिन’ सिरिअलमध्ये नागिन ‘शेषा’ची भूमिका साकारणारी अदा खान सायबर क्राइमची शिकार झाली आहे. तिचे डेबिट कार्ड हॅक करुन तिला 2 लाखाचा गंडा घातला गेलाय.

आज तक या  वृत्तसंस्थेकडून ही बातमी समोर आली आहे.  अदा खानच्या म्हणण्यानुसार, तिच्या अकाऊंटमधून 24 हजार रुपये गेले. या गोष्टीचा तिला धक्का बसला आणि त्यावर चौकशी करताच आपल्या कार्डचा उपयोग केला जातोय हे तिच्या लक्षात आले.

त्यानंतर तिला सलग 4 मेसेज आले यामध्ये तिचे 2 लाख रुपये गेले असल्याचे तिला समजले. सगळे अचानक घडून अल्याने सुरूवातीला तिला समजनासे झाले. परंतु जेव्हा 2 लाख रुपये काढले गेले तेव्हा तात्काळ तिने लगेच बॅंकेत फोन करुन डेबिट कार्ड ब्लॉक केले.

बॅंक आणि पोलिसांनी यात चांगली मदत केल्याचे अदा खानने सांगितले.  या आधी ही दिलजीत कौर आणि नकुल मेहता या दोन कलाकारांसोबत अशा सायबर क्राइमच्या घटना घडल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version