नाशिक, १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाफेड दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याआधी कांद्याचे दर घसरले होते त्यावेळी नाफेडने तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला होता. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ही माहिती दिली.
नाफेडचे व्यवस्थापन हे ग्राहक व्यवहार विभाग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार शेती उत्पादनांचा राखीव साठा तयार करते. यासाठी शेतमालाची खरेदी केली जाते. किंमती स्थिर ठेवण्यासाठी ही खरेदी केली जाते. सध्या महाराष्ट्रातून खरेदी केलेला कांदा राज्यातच विकण्याचे कोणतेही नियोजन नाही. यामुळे नाफेड राज्यात कांदा विक्री करणार या बातमीत तथ्य नाही. गरज नसताना नाफेड आयात करत नाही. यामुळे आयातीबाबत येत असलेल्या वृत्तात तथ्य नाही; असे राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.