Dhananjay Munde on Walmik Karad: ‘माझा सहकारी आज…’; परळीतील प्रचारसभेत धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण

सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडची आठवण धनंजय मुंडेंनी प्रचारसभेत काढल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Dhananjay Munde on Walmik Karad: ‘माझा सहकारी आज…’; परळीतील प्रचारसभेत धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण

Dhananjay Munde on Walmik Karad: परळी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात एका जुन्या आणि गाजलेल्या प्रकरणाची पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडची आठवण धनंजय मुंडेंनी प्रचारसभेत काढल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वाल्मिक कराड त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जायचा. आज धनंजय मुंडेंनी परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण काढली.  

माझा एक सहकारी आज आपल्यात नाही 

दरम्यान, धनंजय मुंडे म्हणाले की, 'परळीतले जगमित्र कार्यालय दिवस-रात्र सुरू असायचे. पण तिथे ज्याची उणीव जाणवते, तो आज आपल्यात नाहीये. कोणाशी कसा न्याय व्हायचा, हे न्यायालयच ठरवेल.' त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी नाव न घेता वाल्मिक कराडची आठवण काढत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

हेही वाचा – 'मुंबईत मराठी माणसाला बाहेर काढणाऱ्यांची आता पाप फेडायची वेळ आली…'; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

धनंजय मुंडेची भावनिक खेळी?

संतोष देशमुख हत्याकांडानंतर वाल्मिक कराड तुरुंगात गेल्यावर, कराड कुटुंबाने धनंजय मुंडेंवरच नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी आरोप केला होता की राजकीय डावात वाल्मिकला अडकवले गेले आणि मुंडेंनी कार्यकर्त्याची उघडपणे बाजू घेतली नाही. परंतु, आता निवडणुकीच्या तोंडावर मुंडेंनी केलेल्या भावनिक वक्तव्यामुळे वाल्मिक समर्थकांना पुन्हा जवळ आणण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा – politicians On Dharmendra : बॉलिवूडच्या ‘ही-मॅन’ला 89 व्या वर्षी निरोप! राजकीयवर्तूळातून भावपूर्ण श्रद्धांजली

पंकजा मुंडेंचे सूचक समर्थन

सभेत उपस्थित असलेल्या पंकजा मुंडेंनीही धनंजय मुंडेंबद्दल अप्रत्यक्ष सहानुभूती व्यक्त केली. त्या म्हणाल्या, राजकीय आरोपांमध्ये अनेक निरपराध लोकही भरडले जातात. गव्हाबरोबर किडेही रगडले जातात. त्यामुळे या दोन्ही मुंडे भावंडांकडून एकाच संदेशाचा सूर उमटताना दिसला.

अंजली दमानियांची तीव्र प्रतिक्रिया

वाल्मिक कराडचे नाव प्रचारात येताच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया संतापल्या. त्यांनी थेट वक्तव्य केले की, 'अशा क्रूर आरोपीची आठवण काढणाऱ्या धनंजय मुंडेंचे चपलांच्या हाराने स्वागत केले पाहिजे. तसेच त्या म्हणाल्या की, परळीकरांनी त्यांना पुन्हा निवडून दिल्यास त्या आयुष्यात परळीत पाऊल ठेवणार नाहीत. तथापी, परळीतील मोठ्या प्रमाणातील वाल्मिक कराड समर्थकांना पुन्हा सक्रिय करण्याचा मुंडेंचा प्रयत्न आहे, अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.  
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version