Latur News : खासगी मालकीच्या भूखंडावरील बेकायदा बांधकाम भोवलं; लातूरच्या तहसीरदारांना महापालिकेने बजावली कारणे दाखवा नोटीस

Latur News : खासगी मालकीच्या भूखंडावरील बेकायदा बांधकाम भोवलं; लातूरच्या तहसीरदारांना महापालिकेने बजावली कारणे दाखवा नोटीस

अजय घोडके, प्रतिनिधी

लातूर : लातूर तालुक्याचे तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या पत्नी सरोजा सौदागर तांदळे यांच्या खासगी मालकीच्या भूखंडावरील बांधकामाबाबत सामाजिक कार्यकर्त्यानी लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाकडे पुराव्यासह लेखी तक्रार केली असून संबंधित बांधकाम करताना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 मधील विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) मधील तरतुदींचा मोठ्या भंग झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. तक्रारीनंतर महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यास टाळताळ करत असल्याचे सांगत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता तक्रारीच्या तब्बल 24 दिवसानंतर महापालिका प्रशासनाने तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या पत्नी सरोजा सौदागर तांदळे यांना 14 दिवसात कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावली आहे. 

हेही वाचा : Maharashtra Politics : 'काळजी करू नका', अमित शाहांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना सल्ला; 'त्या' चर्चेत नेमकं काय घडलं?

यामुळे नगर विकास विभागाचे तत्कालीन उपसचिव निर्मलकुमार चौधरी यांनी 25 फेब्रुवारी, 2025 रोजी राज्यातील विविध नियोजन प्राधिकरणे, महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध करून नियमानुसार तात्काळ कारवाई करण्याबाबत निर्देश दिले असून लातूर शहर महापालिका प्रशासनाने सौदागर तांदळे आणि त्यांच्या पत्नी सरोजा तांदळे यांना बांधकामापूर्वी प्रशासनाने दिलेल्या बांधकाम परवाने, मंजूर नकाशा व त्यांनी प्रत्यक्ष केलेल्या बांधकामाचे सबळ कागदपत्रे 14 दिवसात महापालिका प्रशासनाकडे सादर करण्याचे बजावलेल्या नोटीसमध्ये सूचित केले आहे. त्यामुळे 14 दिवसानंतर सौदागर तांदळे यांच्या बेकायदेशीर बांधकामावर महापालिका प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे समस्त लातूरकरांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version