Bhandara Crime Ganja News : भंडाऱ्यात मोठी कारवाई! केळीच्या ट्रकमधून तब्बल 2 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलीस प्रशासनात मोठी खळबळ

भंडाऱ्यात गांजा तस्करांवर मोठी कारवाई केली आहे. ओडिशातून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या केळीच्या आयशर ट्रकमधून गांजाची तस्करी केली जात होती.
Bhandara Crime Ganja News : भंडाऱ्यात मोठी कारवाई! केळीच्या ट्रकमधून तब्बल 2 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलीस प्रशासनात मोठी खळबळ

भंडाऱ्यात गांजा तस्करांवर मोठी कारवाई केली आहे. ओडिशातून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या केळीच्या आयशर ट्रकमधून गांजाची तस्करी केली जात होती. अखेर या गांजा तस्करांवर मुंबईच्या नार्कोटिक्स विभागानं मोठी कारवाई केली आहे. यावेळी ओडिशा येथून मुंबईच्या दिशेने या आयशर ट्रक मधील कॅरेटमध्ये लपवून सुमारे 245 किलो गांजाची वाहतूक करण्यात येत असल्याची गुप्त माहिती मुंबईच्या नार्कोटिक्स विभागाला मिळाली होती.

हेही वाचा- Crime News : धक्कादायक! 9 वर्षीय चिमुरडीसोबत 58 वर्षीय फादरचं संतापाजनक कृत्य; परिसरात तीव्र रोष

या माहितीवरुन या विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या या आयशर ट्रकचा पाठलाग केला. दरम्यान भंडारा जिल्ह्यातील साकोली लगतच्या सेंदूरवाफा टोल नाक्यावर, गोपनीय माहितीच्या आधारे मुंबईहून आलेल्या एनसीबीच्या पथकाने MH 40 CD 4548 या भाजीपाल्याचा ट्रकची कसून चौकशी केली असता, त्यामध्ये 200 किलो गांजा दडवलेला आढळला. या गांजाची किंमत सुमारे दोन कोटी रुपये पेक्षा अधिक असण्याची सांगण्यात आली आहे.

सदर एनसीबीच्या पथकाकडून झालेल्या कारवाईची नोंद साकोली पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली असून, याप्रकरणी नार्कोटिक्स विभागाच्या पथकाने ट्रक चालक कमलेश बघेल (वय 42, रा. नागपूर) आणि क्लीनर प्रशांत दुर्बे (वय 22, रा. अमरावती) या दोघांना अटक करण्यात आली आहे. केळीच्या कॅरेटमध्ये लपवून एका आयशर ट्रकमधून गांजाची तस्करी होत होती. मुंबईच्या नार्कोटिक्स विभागाने भंडाऱ्यात कारवाई केल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version